Home वणी परिसर पेट्रोल,डिझल व गॅसची महागाई कमी करा..!

पेट्रोल,डिझल व गॅसची महागाई कमी करा..!

287
Img 20241016 Wa0023

भारत बंदला झरी तालुका काँग्रेसचे समर्थन

झरी: देशातील शेतकऱ्यांच्या विरुद्ध तीन काळे कायदे बनवून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप करीत सोमवार दि. 27 सप्टेंबरला संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद चा नारा दिला होता. या देशव्यापी बंद ला झरी काँग्रेस व युवक काँग्रेस ने समर्थन देत विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार गिरिष जोशी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना पाठवले.

संपूर्ण देशातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेला मोठमोठे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने फसवणूक केली आहे. भारतात गेल्या काही वर्षा पासून शेतकरी शेत मजूर मध्यमवर्गीय आणि या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महागाई मुळे त्रस्त झाला असून त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझल व गॅस चे दर मोठ्या प्रमाणात वाढवल्याने गरिबांच्या घरचे गॅस बंद होऊन पुन्हा चुलीचा वापर सुरू झाला आहे.

केंद्र सरकारने जनतेला दिवसा वेगळे स्वप्न दाखवून रात्रीच्या अंधारात मारण्याचे काम करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. गॅसच्या महागाई  व सबसिडी काढल्यामुळे  घरातील संपूर्ण गणित बिगडले आहे. पेट्रोल डिझेल चे दर वाढल्याने सर्वसाधारण जनता तसेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, राजीव येल्टीवार, संदीप बुरेवार, भूमरेड्डी बाजनलावार, विनोद गोडे, केशव नाकले, जानक नाकले, प्रकाश कासावार, निलेश येल्टीवार, राहुल दांडेकर, हरिदास गुर्जलवार, मधुकर टाले, संतोष कोहळे, शरद येल्टीवार, अरविंद भेडोडकर, मधुकर टाले, विठ्ठल गिज्जेवार, नरेश चवरडोल, भगवान चुकलवार, नारायण भोयर, रमेश संसनवार, किशोर मेश्राम, चेतन म्याकलवार सह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.