Home वणी परिसर गुरुकुल कॉन्व्हेंटचे विद्यार्थी “नवोदय” परीक्षेत ‘अव्वल’

गुरुकुल कॉन्व्हेंटचे विद्यार्थी “नवोदय” परीक्षेत ‘अव्वल’

232

अथर्व बहाडे व प्रिन्स बट्टावार यांची निवड

मुकूटबन: जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीच्या वतीने ऑगस्ट महिन्यात निवड परीक्षा घेतली होती. त्यात मुकूटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या दोन विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालून शाळेची परंपरा कायम ठेवली. अथर्व बहाडे व प्रिन्स बट्टावार हे विद्यार्थी अव्वल आले आहेत.

गुरुकुल कॉन्व्हेंट मधील दोन विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची नावे नवोदयच्या प्रॉव्हिजनल यादी मध्ये आली आहेत. यामध्ये अथर्व देवेंद्र बहाडे व प्रिन्स नरसिमलू बट्टावार वर्ग 5 वा चा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले.

दरवर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत, शिष्यवृत्ती पात्रता यादीत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक  सुभाष गजभिये, सर्व शिक्षकवृंद, आई वडील व शाळेच्या व्यवस्थापनाला दिले आहे. शाळेच्या तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक  गजभिये सर यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.