● गजानन करेवाड नवे ठाणेदार
वणी: शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत विविध कोळसा खाणी व त्यावर आधारित अनेक उद्योग धंदे आहेत. कोळसा चोरी, भंगार चोरी, कोंबड बाजार तसेच अन्य अवैध धंदे यावर आळा बसविण्याचे काम ठाणेदारालाच करावे लागते. 23 सप्टेंबरच्या त्या घटनेनेच शिरपूर ठाणेदारांची कसुरी वरून ‘उचलबांगडी’ करण्यात आल्याचे बोलल्या जात असले तरी त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील गजानन करेवाड यांना प्रभार देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे व चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेले ‘हेविवेट’ पोलीस ठाणे म्हणून शिरपूर ची ख्याती आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा दर्जा असलेल्या या ठाण्याचा प्रभार मिळावा या करिता मोठी चढाओढ असते. या ठाण्यात आज पर्यंत ज्यांनी ठाणेदारकी भूषवली त्यांना वणी परिसराचा मोह आवरता आला नाही हे त्रिकालाबाधित सत्य नाकारता येत नाही
कोरोनाचा कालखंड सुरू असताना सपोनि सचिन लूले यांना शिरपूर ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अवैद्य दारू, भंगारचोरी, कोंबड बाजार यावर अकल्पनिय कारवाया केल्या आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्था उत्तमरीत्या सांभाळली तसेच सण उत्सवात चांगली कामगिरी केली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत चालणाऱ्या अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे आज पर्यंत कोणत्याच ठाणेदाराला जमले नाही. चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यामुळे यापुढे कोळसा चोरी हाच उपद्व्याप आता “तस्कर” करणार आहेत. काही दिवसापूर्वी कोळसा चोरी करणारे वाहन स्थानिक पुढाऱ्याने पोलिसांना सोपवले आणि कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका ठेवत लूले यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नव्याने ठाणेदार पदाची जबाबदारी गजानन कारेवाड यांचेवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यापुढे अवैध व्यवसायावर आळा बसविण्याचे आव्हान असणार आहे..