Home वणी परिसर कोरोना काळात शिक्षकांनी केले अध्यायनाचे नियोजन

कोरोना काळात शिक्षकांनी केले अध्यायनाचे नियोजन

119

●शिक्षण विभागाच्या वतीने गौरव 

वणी :- गेल्या 18 महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहे.तरी देखील कोरोना कालखंडात तालुक्यातील शिक्षकांनी नियोजन करून विध्यार्थीना अध्यायनाचे धडे दिले होते.अश्या उपक्रमशील शिक्षकांचा जिल्ह्या परिषद शिक्षण विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला.

कोरोना काळात विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा PPT तयार करून अध्ययन करावे असे सुचविले होते.तालुक्यातील जिल्ह्या परिषदेच्या शाळातील काही शिक्षकांनी आपली  कल्पकता वापरून शैक्षणिक उपक्रम तयार करून अध्ययन केले होते. उत्कृष्ठ PPT तयार करणाऱ्या शिक्षकांचा येथील बीआरसी कार्यालयात गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नागतुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका गट समन्वयक तथा विस्तार अधिकारी नवनाथ देवतळे होते तर परीक्षक म्हणून ए.एस. शोभने, डि. आर. लांडे यांनी काम पाहिले.

यावेळी  तयार केलेल्या PPT चे सादरीकरण शिक्षकांनी केले. वेळाबाई येथील शिक्षिका आशाकला कोवे यांच्या PPT सादरीकरणास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.लालगुडा येथील शिक्षिका वसुधा ढाकणे यांना द्वितीय तर मारेगाव (कोरंबी) येथील मुख्याध्यापक  अरविंद गांगुलवार यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक विनोद नासरे गटसाधन व्यक्ती यांनी केले तर आभार निशा चौधरी  साधन व्यक्ती यांनी केले. या कार्यक्रमास निलेश बावणे आय टी तज्ञ यांनी प्रोजेक्टर व संगणक तंत्रसहाय्यक म्हणून काम पाहिले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देवराव चिडे, अल्का काळे, धनलक्ष्मी लकशेट्टीवर, सूरज चौधरी यांचे सहकार्य लाभले