Home Breaking News आस्मानी संकट….वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

आस्मानी संकट….वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

1112

लिंगटी येथील घटना, मुलगा जखमी

झरी: झरी जामनी तालुक्यातील लिंगटी शेत शिवारात शुक्रवार दि.1 ऑक्टोबरला 4 ते 4.30 वाजताच्या दरम्यान वीज पडून घडलेल्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू  झाला तर मुलगा जखमी झाला आहे.

शुक्रवारी दुपारी अचानक मेघ दाटून आले, वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने पावसाला सुरवात झाली. लिंगटी शिवारातील नाल्या लगत मत्ते यांच्या शेतात अचानक वीज पडली. यावेळी त्या ठिकाणी असलेले शेख जब्बार शेख मैताब(65) हे घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. तसेच त्यांचा मुलगा रहीम याला सुद्धा विजेचा जबर झटका लागल्याने त्याची शुद्ध हरपली होती.

घटनेच्या दिवशी अवकाळी पावसाचे वातावरण पाहून बाप-लेक शेतातील सोयाबीन झाकत असताना सादर घटना घडली. काही वेळानंतर रहीम शुद्धीवर आला त्याने गावातील मित्र व नातेवाईकांना फोन लावून घडलेली हकीकत सांगितली. घटनेचे गांभीर्य बघता ग्रामस्थ व अन्य नागरिकांनी घटनास्थळ गाठले.

याप्रकरणी पाटण पोलिसांना सूचित करण्यात आले. ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून रीतसर पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदन साठी रुग्णालयात पाठवला तर मुलगा रहीम याला पुढील उपचाराकरिता वणीला पाठविण्यात आले आहे. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे