●भरारी पथकाची कारवाई
वणी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांना तिलांजली देत मद्यपीचे चोचले पुरविण्यासाठी भल्या पहाटे बियर बार उघडतात. दारूची विक्री करणाऱ्या अशा अनुध्यप्ती धारकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे.
सकाळी झोपून उठल्यावर माणसाला गरज असते ती चहाची, मात्र काही महाभाग सकाळीच दारूच्या घोट पोटात रिचवतात. याच संधीचे सोने करणाऱ्या दारू व्यावसायिकांनी आपली दुकाने पहाटेच उघडण्याची नियमबाह्य पद्धत सुरू केली आहे.
वणी परिसर आर्थिकदृष्टया संपन्न असल्याने या परिसरात 72 बियर आहे. शासनाने दारू विक्री करण्याकरिता नियमावली व वेळेचे बंधन दिलेले आहे. मात्र नियमांना व्यावसायिका कडून तिलांजली दिल्या जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आले. त्यांनी वणी शहरातील बियर बार तपासणीची मोहीम हाती घेतली.
दि 30 सप्टेंबर ला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यवतमाळ व पांढरकवडा येथील भरारी पथकाने भल्या पहाटे शहरातील बियर बार ची तपासणी केली. या तपासणी मोहीम दरम्यान लॉर्ड्स बियर बार, सेंटर पॉईंट, विनर्स बियर बार, प्राईड बियर बार, स्वागत बियर बार व सत्कार बियर बार हे ठरवून दिलेल्या वेळेच्या आधीच उघडून दारू विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली आहे.