Home वणी परिसर मुख्याध्यापक भास्कर काळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

मुख्याध्यापक भास्कर काळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

368

वणी:- येथील विवेकानंद विद्यालयातील  शांत,संयमी,कार्यकुशल , गणित विषयाचे तज्ञ मुख्याध्यापक भास्कर वसंतराव काळे हे शासन निर्णयानुसार नियत वयोमानाने ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. शंकर क्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभ पार पडला. प्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून मंडळाच्या अध्यक्षा ताराबाई ठावरी , सचिव अविनाश ठावरी संचालिका कांताबाई ठावरी, वंदनाताई वऱ्हाटे , विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनंत ऐेकरे ,माजी उपमुख्याध्यापक रामकृष्ण बोबडे , माजी पर्यवेक्षक प्रविण इंगोले व गौतम तेलंग , विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता शेकार , विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिलिप आसकर पर्यवेक्षिका वसुंधराताई हेमके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिलिप आसकर यांनी केले. संस्कारपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून काळे सरांच्या कार्यशैलीची प्रशंशा केली. विद्यालयाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न , त्यांची अध्यापनशैली युवा शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. वणी पंचक्रोशीत उत्कृष्ट गणित शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्व मान्यवरांनी सत्कारमुर्तींना पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.

विवेकानंद विद्यालय व विवेकानंद कर्मच्यारी पतसंस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ ,भेटवस्तू व स्मृतीचिन्ह देवून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . डॉ . शंकर वऱ्हाटे व प्रमुख अतिथी अविनाशभाऊ ठावरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळच्या अध्यक्षा ताराबाई ठावरी यांचे हस्ते त्यांच्या पत्नी संगीताताई यांचा साडी चोळी देवून यथोचित सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भास्कर मोरे व विलासराव पारखी यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम पिटलावार यांनी केले. विवेकानंद माध्यमिक , प्राथमिक, तांत्रिक विघालयाचे समस्त कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास पारखी , संतोष बेलेकार , किशोर बोढे, गजानन राठोड , हेमचंद्र तिखट, प्रितेश लखमापूरे यांनी अथक परिश्रम घेतले .