Home क्राईम बालिकेला आमिष दाखवून केला ‘अत्याचार’

बालिकेला आमिष दाखवून केला ‘अत्याचार’

1057

तीन महिन्यांनी ‘ती’ गवसली

अवघ्या 9 व्या वर्गात शिक्षण घेणारी ‘ती’, त्या बलिकेच्या आज्ञानाचा फायदा घेऊन त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि फुसलाऊन पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून ‘अत्याचार’ केला. तब्बल तीन महिन्यानी तिला शोधण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बालिका तालुक्यातील नवीन वागदरा येथे आपल्या परिवारासह राहते. येथील शहरातील एका शाळेत ती 9 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. दामले फैलात राहणाऱ्या मजनुची नजर तिच्यावर पडली. तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.

 

मुलगी बेपत्ता असल्याने पालकांनी दि 3जुलै ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अपहरणाचा गुन्हा नोंद केला. ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी तपास सुरू केला.

2 ऑक्टोबर ला 15 वर्षीय बालिका शहरातील दामले फैलातील मल्लेश निलकुंटावार याचे घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बालिकेची सुटका केली मात्र मल्लेश पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी आधीच दाखल केलेल्या गुन्ह्यात अत्याचाराच्या गुन्ह्याची वाढ केली असून आरोपीचा शोध घेत आहे.

वणी: बातमीदार