Home वणी परिसर संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान

संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान

109

शिबिरात 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान

संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

झरी तालुका हा मागास तालुका असुन पाहिजे तेवढ्या प्रमाणात रक्तदानांची जागृती तालुक्यात झालेली नाही. रक्तदानाबाबत लोकांना त्याचे महत्त्व देखील कळले नाहीत. रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी व त्याचे महत्त्व लोकांना कळावे याच हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते तर प्रमुख उपस्थिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, ठाणेदार संगिता हेलोंडे, डाॅ. विरखडे, समिर लेनगुळे, केतन ठाकरे, निलेश येल्टीवार, दत्ता डोहे, नितेश ठाकरे, संदिप आसुटकर, वैभव मोहितकार, कुणाल पानेरी यांची उपस्थिती होती.

झरी: बातमीदार