Home Breaking News व्यथा वेकोलीची… लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः…

व्यथा वेकोलीची… लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः…

552

मुंगोली चेकपोस्ट 2 चे सीसीटीव्ही बंद

रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास WCL च्या मुंगोली कोळसा खाणीत कोळशासह ट्रक जाळण्यात आला. अतिशय भयंकर असलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ माजली.

मुंगोली चेकपोस्ट जवळ तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 6 ते 7 इसमांनी ट्रक थांबविला. चालकाला खाली उतरविले आणि धमकी देत चक्क ट्रकवर पेट्रोल शिंपडून आग लावली. क्षणात त्या ट्रकचाच कोळसा झाला या घटनेचे गांभीर्य बघता शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कारेवाड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून तपास आरंभला.

WCL च्या वणी उत्तर व वणी एरियात अनेक कोळसा खाणी आहेत. मागील अनेक वर्षांपासून कोळसा चोरी, अफरातफरी च्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. सातत्याने घडणाऱ्या अशा विघातक घटनेमुळे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशी मागणी तत्कालीन गृह राज्यमंत्री यांनी केली होती. ड्रोन कॅमेरे तर दूर सध्यस्थीतीत सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद असल्याचे वास्तव उजागर झाले आहे.

चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH 34 BG 0862 चा ट्रक रविवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 6 ते 7 इसमांनी पेट्रोल टाकून जाळला आणि पळून गेले. पोलिसांपुढे तपासाचा महत्वपूर्ण धागा सीसीटीव्ही फुटेज होता. त्यावरून आरोपीना शोधणे सोपे झाले असते मात्र सीसीटीव्ही च बंद असल्याने आता तपासाची दिशा बदलावी लागणार आहे.

WCL प्रशासन सतत दक्ष असल्याचे भासवत असतात. तर मुंगोली चेकपोस्ट 2 वरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद का ? हा संशोधनाचा विषय आहे. कोळसा चोरी लपविण्यासाठी तर हा खटाटोप नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोळसा चोरांच्या हितासाठीच सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले असावे असा संशय निर्माण होत आहे. लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था WCL प्रशासनाची झाली आहे.

वणी: बातमीदार