Home वणी परिसर कुलस्वामिनी जैताई माता संस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज

कुलस्वामिनी जैताई माता संस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज

126

वणी परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले कुलस्वामिनी माता जैताई देवस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. दि. 7 ते 15 आँक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. दि.7 ला पहाटे 6 वाजता घटस्थापना होणार असून त्याच दिवशी भगवान शंकराच्या आकर्षक मूर्तीची स्थापना होणार आहे. शंकरजी ची मूर्ती वणीतील प्रख्यात शिल्पकार अशोक सोनकुसरे यांनी तयार केली आहे.

या शिवाय रोज रात्री 7:30 ते 9:30 पर्यंत कीर्तन, कथाकथन , भजन, देवीच जागरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी 11 वाजता देणगीदारांच्या देणगीतून महाप्रसाद होणार आहे. सायं.6:30 वाजता सामुहिक आरती होईल. दि.10 व 11 आँक्टोबर रोजी किशोर गलांडे यांचे कीर्तन व कथाकथन आणि दि. 13 ला जैताई मंदिर व संस्कार भारती प्रस्तुत मासिक संगीत सभेचा देवी गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांनी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

वणी: बातमीदार