Home Breaking News खद, खद..’स्टार’…कराळे मास्तरवर कारवाईचे ‘गंडांतर’

खद, खद..’स्टार’…कराळे मास्तरवर कारवाईचे ‘गंडांतर’

1246

तेली समाज बांधव आक्रमक

समाजभावना दुखावल्याचा आरोप

आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  करणारे फिनिक्स अकॅडमी चे खद, खद..’स्टार’…नितेश कराळे व व्यंगचित्रकार गणेश वानखेडे यांच्यावर कारवाईचे ‘गंडांतर’ आले आहे. समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत तेली समाज बांधव आक्रमक झाला आहे. मंगळवार दि. 5 ऑक्टोबर ला येथील विदर्भ तेली समाज महासंघाचे वतीने SDO मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विस्तृत मार्गदर्शन व सध्यस्थीतीवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे वर्धा येथील फिनिक्स अकॅडमी चे प्रा. नितेश कराळे व व्यंगचित्रकार गणेश वानखेडे (मंगरुळपिर जि. वाशिम) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून   समाज बांधवांच्या भावना दुखावल्या चा आरोप करण्यात आला आहे.

प्रा. नितेश कराळे यांच्या फेसबुक अकाँऊटवर 28 सप्टेंबरला तेली समाजाचे मानचिन्ह असलेल्या तेलघाण्यास अनुसरून व्यंगचित्र काढले व जातीवाचक शब्दाचा वापर करून सामाज माध्यमावर (social media) वर प्रसारीत करून समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली समाजाचे भुषण आहेत. अशा पदसिध्द व्यक्तीबाबत त्यांच्याच जातीवरुन जातीवाचक विधान करुन तेली समाज व इतर समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रसार माध्यमाचा चुकीचा गैरवापर करून केवळ प्रसिध्दीसाठी धार्मीक भावना दुखावनाऱ्या नितेश कराळे व व्यंगचित्रकार गणेश वानखेडे यांचेवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी संतोष डंभारे, रवी बेलूरकर, श्रीकांत पोटदुखे, रवींद्र लिचोडे, विशाल ठोंबरे, विलास क्षीरसागर, गणेश चौधरी, शरद तराळे, प्रणव पिंपळे, आशिष डंभारे, लखन खनके, साहिल लोहकरे, वैभव निमकर सह समाज बांधव उपस्थित होते.