Home वणी परिसर त्या..जंगल सदृष्य भागातील माता मंदिराचा जीर्णोद्धार..!

त्या..जंगल सदृष्य भागातील माता मंदिराचा जीर्णोद्धार..!

383
Img 20241016 Wa0023

वणी ची कुलस्वामीनी जैताईमाता

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

वणी शहरात यवतमाळ मार्गावरील जैताई मातेचे मंदिर गावातील समाजाच्या सर्व स्तराच्या भाविकांचे  फार मोठे श्रध्दास्थान झाले आहे़. नवरात्रोत्सवात नऊ  दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येते़ मात्र यावर्षी शासनाचे नियम व कोरोना महामारीचे संकट यामुळे उत्साहावर विरजण पडले असले तरी कोविड त्रिसूत्रीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो  || १ ||

वणी ची कुलस्वामीणी म्हणुन जैताई मातेला पुजल्या जाते़ पुर्वी हा भाग जंगल सदृष्य होता परंतु भाविक भक्तांची रिघ लागलेली असायची़ त्या काळात नवरात्रीचा उत्सव लहान स्वरूपात का होईना परंतु भक्तीभावाने गुलाबराव बाकडे व मधुकरराव तालकवार आपल्या परिने ग्रामस्थासह  नवरात्रोत्सव साजरा करीत होते़. स्व. नानासाहेब दामले, वणीचे गावपाटील स्व. सांबशिवराव पाटील, प्रयागदास नरसिंगदास मुनीम स्व. मथुरादासजी, स्व. हरीदासभाईजी अदाणी यांनी त्या काळात मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पहिला प्रयत्न केला.

येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात 1965 मध्ये प्राचार्य म्हणुन विद्यावाचस्पती, विचारवंत राम शेवाळकर रूजु झाले़ त्यांनी मंदिराचे आवारात एके दिवशी विद्यार्थ्यांसह श्रमदान केले़. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. 3 सप्टेंबर 1969 ला पहिली कुदळ मारून मंदिराच्या जिर्णोद्धाराला सुरवात झाली़.

जैताई माता मंदिरात होत असलेले श्रमदान पाहुन गावातील सर्व स्तरातील नागरीक यात सहभागी होवु लागले़. लोक वर्गनीतुन गोळा झालेल्या 40 हजार रुपयातुन 1971 मध्ये मंदिराच्या सभा मंडपाचे निर्माण झाले़ मंदिराचा जिर्णोद्धार झाल्या नंतर त्या संकल्पाची सांगता शतचंडी यज्ञाने करण्यात आली तेव्हा पासुन मंदिराचा आलेख वाढतच असल्याचे दिसत आहे़.