● टप्प्यात आरोपी मात्र…
● पोलिसांचे 2 पथक मोहिमेवर
मुंगोली कोळसा खाणीत रविवार दि.3 ऑक्टोबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 अज्ञात आरोपीने कोळशाचा ट्रक जाळला. कारण काय ते आरोपीच्या अटकेनंतर स्पष्ट होईल मात्र नव्यानेच शिरपूर पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या ठाणेदाराला आरोपीनी ‘सलामी’ दिली. तब्बल 5 दिवस झाले, निष्णात आरोपी पोलिसांना गुंगारा देताहेत.
कोळशाचा भरलेला ट्रक जळणे (the burning truck…) म्हणजे भविष्यातील “टोळी युद्धाची” चाहूल आहे. कोळसा खाणीत चालणारे अनधिकृत धंदेच शिरपूर ठाण्याला जिल्ह्यात “हेविवेट” चा दर्जा मिळवून देत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
रविवारी रात्री मुंगोली कोळसा खाणीत 6 ते 7 अज्ञात तरुणांनी चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH-34-BG-0862 या ट्रक ची शोधाशोध केली. आणि त्याच ट्रकला लक्ष करत पेटोल शिंपडून आगीच्या हवाली केले. कोळसा खान परिसरात घडलेल्या या घटनेला सर्वस्वी वेकोली प्रशासन जबाबदार आहे. प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात समाजकंटक येतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत असून यात अधिकारी तर सहभागी नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
मुंगोली चेक पोस्ट क्रमांक 2 परिसरात घडलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ माजवली असली तरी हे आरोपी सराईत असून त्यांचा या परिसरात राबता असावा अशी शंका निर्माण झाली आहे. सर्व सामान्यांना तसेच समाज माध्यमाच्या प्रतिनिधींना प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश नाकारल्या जातो मग हे आरोपी नेमके कोण याचे उत्तर केवळ वेकोली प्रशासनच देऊ शकतात.
मुंगोली चेक पोस्ट क्रमांक 2 मधील ‘तिसरा डोळा’ बंद असल्याचे मत पोलीस प्रशासन व्यक्त करीत आहे. वेकोली प्रशासनाने तर मुद्दाम ‘ते’ बंद केले नाही ना असा संभ्रम निर्माण होत आहे. आणि त्याच चेक पोस्ट मार्गे आरोपींने पलायन केल्याचे बोलल्या जात आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक अरिपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. एक पथक तेलंगणा तर दुसरे पथक औरंगाबाद परिसरात आरोपींचा तांत्रिक बाबी वरून शोध घेत आहे. पोलिसांच्या दोन पाऊले पुढे आरोपी असून सतत लोकेशन बदलवत असल्याने क्षणोक्षणी ‘गुंगारा’ देत आहे.
वणी: बातमीदार