● मुस्लीम महीला विवाह अधिनियम नुसार कारवाई
मुस्लीम महीला विवाह अधिनियम अंतर्गत वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी हा पोलीस कर्मचारी असून त्याने तलाक, तलाक, तलाक असे म्हणत निघून गेल्याची तक्रार पत्नीने नोंदवली होती.
इम्राण दिवान खान (40) रा. रवीनगर हा वणी पोलिसात कार्यरत आहे. त्याचे पत्नी सोबत सतत घरगुती कारणावरून खटके उडत होते. तसेच शारीरीक व मानसिक छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
इम्राण खान याने पत्नी ला 7 लाख रुपये देतो असे कबूल केले होते. सदर घटना 1 एप्रिल 2019 ते 8 आक्टो 2021 या दरम्यान ची आहे. त्या रकमेतील अडीच लाख रुपये दिले व उर्वरित रक्कम जुन 2021 मध्ये देतो असे सांगितले होते परंतु आजपावेतो देण्यात आली नाही असे तक्रारीतून स्पष्ट करण्यात आले आहे.
इम्रान याला पत्नीने आपण सोबत राहु असे म्हटले असता आरोपीने मी तुझ्या सोबत राहत नाही असे म्हणुन पत्नीला तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणुन तेथुन निघुन गेला. अशा तक्रारीवरून पोलिसात 498 (अ) भादवी सह कलम 4 मुस्लीम महीला विवाह अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वणी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असावा असे बोलल्या जात आहे.
वणी: बातमीदार