Home Breaking News चक्क…डोक्‍यात रॉड हाणला, तरूण जागीच ठार

चक्क…डोक्‍यात रॉड हाणला, तरूण जागीच ठार

2390

आबई फाटा येथे घडला थरार

शिरपुर पोलीस स्‍टेशन हददीतील आबई फाटा परिसरात यथेच्‍छ गुलाबी नशा करून बाहेर पडताच क्षुल्‍लक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि 24 वर्षीय तरूणाच्‍या डोक्‍यात रॉड हाणला, रक्‍ताच्‍या थारोळयात पडलेल्‍या तरूणाला तात्‍काळ उपचारार्थ चंद्रपुरला हलविण्‍यात आले माञ उपचारा दरम्‍यान मत्‍यू झाल्‍याची घटना रविवारी राञी घडली.

प्रतिक उर्फ गोलू चंद्रभान वडस्‍कर (30) रा. वेळाबाई असे आरोपीचे नांव आहे. तो त्‍यांच्‍या काही मिंञासमवेत आबई फाटा परिसरातील एका मदिरालयात गेला होता. सर्वांनी यथेच्‍छ मद्यपान केले आणि मदिरालयांच्‍या बाहेर पडले.

कोणत्‍यातरी क्षुल्‍लक कारणावरुन त्‍यांच्‍यात बिनसले, वादावादी सुरू झाली, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गोलू ने लगतच पडलेला रॉड आकाश गोवारदिपे (24) रा. वेळाबाई याच्‍या डोक्‍यात हाणला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेला सोमेश्वर कावळे (19) हा सुद्धा जखमी झाला आहे.

वर्मी घाव लागल्‍याने आकाश खाली कोसळला प्रचंड रक्‍तस्‍ञाव होत होता. घटनास्‍थळी उपस्थित असणाऱ्यांनी त्‍याला तात्‍काळ चंद्रपुरला उपचारार्थ हलविले माञ उपचारा दरम्‍यान त्‍याची प्राणज्‍योत मालवली.

या प्रकरणी मृतकाच्‍या परिवाराने शिरपुर पोलीसात तक्रार दाखल केली असुन आरोपी ला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे तर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी ठाणेदार गजानन कारेवाड यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

वणी: बातमीदार