Home Breaking News हत्ये्चा थरार….’आकाश’ ची हत्या रागाच्या भरात

हत्ये्चा थरार….’आकाश’ ची हत्या रागाच्या भरात

957

मद्य प्राशन ठरले हत्येचे कारण

एकेकाळी एकञीत दारू तस्‍करी चा व्‍यवसाय करणारे नवा व्‍यवसाय करण्‍याच्‍या मानसिकतेत होते. “जब मिलजाये चार यार तो बात हो गुलजार” ही म्‍हण कार्यान्‍वित करण्‍याचा प्रयत्‍न करणारे आज आरोपींच्‍या पिंजऱ्यात अडकलेत. मद्य प्राशनानंतर रागाच्‍या भरात लोखंडी रॉड ने जबर मारहाण करत जीव घेणारा सराईत गुन्‍हेगार ‘गोलू’ पोलीसांच्‍या जाळयात अडकला असुन यात आनखी आरोपींची भर पडणार आहे.

झटपट श्रीमंतीचा हव्यास तरुणांना वाम मार्गाला नेत असल्‍याचे वास्‍तव या घटनेतुन आधोरेखीत होत आहे. गोलु उर्फ प्रतीक चंद्रभान वडस्कर (28) वेळाबाई येथीत निवासी. हा चंद्रपुरात दारूबंदी असतांना अवैद्य दारू तस्‍करी करीत होता. या कामात मदत करणारे त्‍यांचे मिञ सोमेश्‍वर कावळे (19), आकाश हरिदास गोवारदिपे (23) आणि अन्‍य काहींचा यात समावेश आहे. दारूबंदी उठल्‍यानंतर गोलू ने स्‍वतचा ढाबा टाकण्‍याचा विचार केला आणि आबई फाटा परिसरात बांधकाम सुरू केले.

घटनेच्‍या दिवशी रविवारी सर्व सवंगडी आबई फाटा परिसरातील एका बार मध्‍ये गेले. यथेच्‍छ मद्य प्राशन केल्‍या नंतर त्‍यांचा क्षुल्‍लक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले गोलू ने आपल्‍याच मिञांना रॉड च्‍या साहयाने बेदम मारहाण केली. राग अनावर झाल्‍यामुळे नेमके काय करतोय हे त्‍याला कळत नव्‍हते. यावेळी ‘आकाश’ बार समोरच बेशुध्‍द झाला त्‍याच्‍या पाठीवर, डोक्‍यावर जबर मारहाण करण्‍यात आली. तर सोमेश्‍वर ला सुध्‍दा चांगलाच चोप दिला आकाश रक्‍ताच्‍या थारोळयात पडला तरी गोलू थांबायला तयार नव्‍हता सोमेश्‍वर ने आपल्‍या दुचाकी वरून आकाश ला घरी पोहचवले. रक्‍तबंबाळ अवस्‍थेतील मुलाला बघुन घरच्या मंडळीने आपला रोष सोमेश्‍वर वर व्‍यक्‍त केला.

आकाशच्या घरच्या मंडळीने जखमी अवस्थेतील आकाशला मोहदा येथील रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. खाजगी वाहनाने चंद्रपूरला नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेने वेळाबाई या गावात प्रचंड खळबळ माजली होती. रात्रभर गावात स्मशान शांतता पसरली होती.

सोमवारी सकाळी मृतकाची आई माया हरिदास गोवारदिपे (48) हिने तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशन गाठत रितसर तक्रार दाखल केली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले. काहीच घडले नाही या अविर्भावात मारेकरी गोलू हा आबाई फाटा परीसरातील ढाब्यावर पाणी शिंपडत असतांना पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक राम कांडुरे, अनिल सुरपाम, गांधार घोडाम, सुगत दिवेकर, प्रमोद जुणूनकर, गजानन सोनसावळे, अभिजीत कोशटवार यांनी केली.

वणी: बातमीदार