येथील अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, मध्ये बथकम्मा आणि दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्ही.एन रेड्डी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या व्ही. सौम्या, प्राचार्य मंगेश आवारी उपस्थित होते.
बथकम्मा हा तेलंगणाचा राज्याचा सण आहे तर दसरा हा सण नवरात्रीच्या काळात महिला विशेषतः साजरा करतात.सण आमच्या स्मृतींना उजाळा देतात प्रेम आणि सौदार्ह्यपूर्ण वातावरण निर्माण करून सर्वाना एकत्र आणतात. विद्यार्थ्यांनी बथकम्मा सजवल्या आणि त्यांच्या कृती, भाषणांद्वारे बथकम्माचे महत्त्व चित्रित केले आणि सणाचे महत्त्व विषद केले . विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि त्याची रूपे यांची माहिती दिली.
सण किती पर्यावरणपूरक आहे हे स्पष्ट केले. कोविड नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांनी बथकम्माच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्ही.एन. रेड्डी यांनी विद्यार्थ्यांनी नाट्य, गायन, काव्य तथा शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये कामगिरी केल्याबद्दल बक्षीस वितरण केले.
मार्गदर्शन करतांना डॉ रेड्डी म्हणाले की सर्व प्रकारचे कार्यक्रम मुलांना त्यांच्या ज्ञानात भर घालण्यास उपयोगी ठरत असल्याचे सांगून त्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या भव्य यशासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- वणी:बातमीदार