Home Breaking News सावधान…चायनीज राईस मध्ये निघाला चक्क “घुई” किडा

सावधान…चायनीज राईस मध्ये निघाला चक्क “घुई” किडा

2031

ग्राहक संतप्त, बेजबाबदार विक्रेते
संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

शहरातील साई मंदिर परिसरातील एका चायनीज स्टॉल वरून वांजरी येथील नथुजी बोबडे यांनी बुधवारी दि. 13 ऑक्टोबरला रात्री चायनीज राईस विकत घेतला घरी जाऊन बघताच त्यात चक्क “घुई” किडा आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली.

चायनीज राईस चे फॅड शहरात कमालीचे वाढले आहे. ठीक ठिकाणी स्टॉल थाटण्यात आले आहे. आबालवृद्धांपर्यंत चायनीज चे प्रकार चाखणारे आहेत. विशेषतः महिला आणि मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. स्वच्छतेचा अभाव असला तरी जिभेचे चोचले पुरवताना ग्राहक दिसताहेत.

चायनीज पदार्थात शरीराला अपायकारक असणारे घटक टाकल्या जाते. हजीना मोटो नामक वस्तू पदार्थाचा स्वाद वाढवत असला तरी ते अपायकारक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. चीन मधील हा खाद्य प्रकार देशभरात झपाट्याने पसरला मात्र तेथे किडे कीटूक खाणारे आहेत आता तर येथे सुद्धा किडे चायनीज राईस मध्ये निघायला लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन विभाग बेजबाबदार असल्याचा प्रत्यय सातत्याने येतो. कोणत्याही खाद्य विक्रेत्यांची प्रतिष्ठाने तपसल्याचे ऐकिवात नाही. चायनीज सेंटर मध्ये काय सावळा गोंधळ सुरू आहे हे त्या विभागाला माहीत नाही. सध्या दिवाळीचा उत्सव येतोय मिठाईच्या दुकानातील खाद्यपदार्था ची काटेकोर तपासणी होणे गरजे आहे. त्यातच संबंधित चायनीज स्टॉलवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्या ग्राहकाने केली आहे.
वणी: बातमीदार