Home Breaking News क्रिकेट सट्टा…LCB व SYBER CELLचे “धाडसत्र”

क्रिकेट सट्टा…LCB व SYBER CELLचे “धाडसत्र”

596
Img 20240930 Wa0028

3 ठिकाणी कारवाई, 6 सट्टेबाज ताब्यात

विश्वचषक T-20 क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. या रंगतदार होणाऱ्या प्रत्येक सामन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात सट्टा (Beting) खेळणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. रविवार दि. 24 ऑक्टोबरला LCB व SYBER CELL ने तीन ठिकाणी धाडसत्र अवलंबत 6 बुकींना ताब्यात घेत 3 लाख 42 हजार 142 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

क्रिकेटचे सामने व बेटिंगचे वेड तरुणाईला झटपट श्रीमंतीच्या मायाजाळात अडकवत आहे. क्षणाक्षणाला प्रत्येक चेंडूवर सट्टा खेळल्या जात असल्याचे वास्तव अनेकांना देशोधडीला लावत आहे. बऱ्याच धनदांडग्यांची नवं तारुण्यात आलेली मुले क्रिकेटच्या सट्टा बाजारात आपलं अस्तित्व संपवून बरबाद झाली आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान या T-20 क्रिकेट सामन्यावर पुसद शहरात ऑनलाईन सट्टा (beting) खेळविल्या जात असल्याची गोपनिय माहीती police अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांना मिळाली. त्यांनी प्रकरणाची शहानिशा करून सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची पथके तयार केली आणि धाडसत्र अवलंबले.

शेख समीर उर्फ कमरान शेख शमशु (24) राहणार गांधीनगर पुसद, संदिप रावसाहेब देशमुख(33) राहणार वसंतनगर, कैलास लखनलाल साहू (43) राहणार रुग्वेद नगर कॅम्प पुसद यांच्या घरी धाड टाकण्यात आली. यावेळी अरविंद पवार व बाळासाहेब रावसाहेब देशमुख रा.वसंत नगर व मोहम्मद अल्ताफ मोहम्मद ईसाक (40) वसंतनगर, पुसद असे अटकेतील सटोडीयांची नावे आहेत.

पुसद शहरात भारत विरुद्ध पाकिस्तान या T-20 क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिन्ही घटनेतील आरोपी कडून 2 लॅपटॉप, 14 मोबाईल संच, 2 टिव्ही व रोकड असा एकूण 3 लाख 42 हजार 170रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 6 सटोडीयांना ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध शहर व वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या आदेशाने LCB प्रमुख पोनि प्रदिप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपमाला भेंडे, सपोनि अमोल पुरी, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि भगवान पायघण, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, उल्हास कुरकुटे, यवलु चहान, सुधिर पिदुरकर, मो. भगतवाले, सलमान शेख, पंकज गिरी, अजय निंबा:ळकर व चालक प्रविन कुथे यांनी केली.
वणी: बातमीदार