Home वणी परिसर नालीचे सांडपाणी चक्क घरात

नालीचे सांडपाणी चक्क घरात

329

आमरण उपोषणाचा ईशारा

येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये वास्तव्यास असलेल्या अनवर खान हाफिज खान यांच्या घरात चक्क नालीचे सांडपाणी शिरत असल्याची तक्रार तक्रार करण्यात आली. नालीची साफसफाई न केल्यास दि. 29 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतीला निवेदनातून दिला आहे.

दहा हजाराचेवर लोकसंख्या असलेल्या गावात 6 वार्ड असून प्रत्येक वार्डात दाट लोकवस्ती आहे. गावातील अनेक वार्डात अरुंद रस्ते व त्या रस्त्याच्या कडेला सांडपाण्याच्या नाल्या बनलेल्या आहेत. दरवर्षी नाल्या सफाई करण्याच्या ठेका दिला जातो.

कंत्राट दिल्यानंतर सुद्धा नाल्याची साफसफाई का होत नाहीत हे मोठा प्रश्न आहे. नाल्या साफ करताना त्या कामावर त्या वार्डातील सदस्याने देखरेख ठेवायली हवी. परंतु तसे होताना दिसत नाही.

वार्ड 4 मधील गेल्या 1 वर्षांपासून नाली साफ होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुंबलेल्या नाल्याचे सांडपाणी घरात शिरत आहे. अनेकवेळा याबाबत तक्रारी केल्यात मात्र निवारण होत नाही. अखेर त्रस्त नागरिकाने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
राजूर कॉलरी: बातमीदार