Home राजकीय दणदणीत…भाजपच्या गडात काँग्रेसची “प्रवेशबाजी”

दणदणीत…भाजपच्या गडात काँग्रेसची “प्रवेशबाजी”

980
Img 20240613 Wa0015

पक्षप्रवेशाची शृंखला सुरूच
200 कार्यकर्त्यांचा प्रवेश

पक्ष संघटन वाढविण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी चांगलेच सरसावले आहेत. भाजप नगरसेवकाच्या प्रभागात भगदाड पाडण्यात येत असून पक्षप्रवेशाची शृंखला सुरूच आहे. रविवारी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात प्रभाग 1 मधील 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या गडात काँग्रेसची “प्रवेशबाजी” सुरू असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस चा “हात” मजबूत करण्याचा निर्णय घेत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीची रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना संपूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरण्याचा निर्णय स्थनिक पक्ष श्रेष्टींनी घेतल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केल्याचे पक्ष प्रवेश सोहळ्यातून दिसत आहे. या पूर्वी भाजपचा एक नगरसेवक गळाला लावला तर भाजपा नगरसेवकाच्या प्रभागातील शेकडो महिला कार्यकर्त्यांना काँग्रेस मध्ये सामावून घेत भाजपा समोर कडवे आव्हान उभे केले आहे.

रविवार दि. 25 ऑक्टोबरला नांदेपरा मार्गावरील तिरुपती मंगल कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला माजी आमदार वामनराव कासावार, डॉ मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, इजहार शेख, टीकाराम कोंगरे, ओम ठाकूर, प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, मंगला झिलपे यांच्या उपस्थितीत 200 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
वणी; बातमीदार

Previous articleक्रिकेट सट्टा…LCB व SYBER CELLचे “धाडसत्र”
Next articleWCL ला ग्रामपंचायतीचा ‘अल्टीमेटम’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.