● दीपक तामशेटवार यांचे प्रतिपादन
समाजातील सर्व प्रकारचे भेद संपावेत म्हणून समरसता गतिविधी द्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. यातून देश सामर्थ्यवान बनेल. या कलियुगात कोणी अवतरण होणार नाही, यासाठी संघटन शक्ती महत्वाची आहे. त्यामुळे देश सामर्थ्यवान बनविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेटवार यांनी केले.
वणी नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने देशासाठी जगले पाहिजे. संघ कधीच नकारात्मक विचार करीत नाही. हिंदूंना स्वावलंबी, आत्मरक्षनास सिद्ध करणे, प्रत्येक व्यक्तीने आत्मनिर्भर व्हावे यासाठी संघ सतत झटत असतो. संघ – कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, गोसेवा राष्ट्रहिताचे उपक्रम संघ चालवितो.
या उत्सवात येथील रामकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव अविनाश ठावरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत व नगर संघचालक किरण बुजोणे उपस्थित होते. या प्रसंगी सांघिक गीत ऍड. प्रेमकुमार धगडी यांनी घेतले. वैयक्तिक गीत मनोज ढुमे यांनी सादर केले. अमृत वचन अनिरुध्द कौरासे व सुभाषित पारितोष पानट यांनी सांगितले.
त्यानंतर स्वयंसेवकाद्वारे व्यायाम योग, दंड, समता व घोषचे सादरीकरण करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त नागरिकांची संघटना आहे. याच खर स्वरूप समाजासमोर अजून आले नाही. संघविषयी अजूनही जाणीवपूर्वक नकारात्मक भावना अजूनही समाजात पसरवल्या जातात. त्यामुळे स्वयंसेवक आता जास्त जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रिया प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना अविनाश ठावरी यांनी व्यक्त केली.
या उत्सवाचे प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन नगर कार्यवाह निलेश चचडा यांनी केले. या प्रसंगी नगरातील
मातृशक्ती, संघप्रेमी नागरिक, पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार