●तीन महिन्यातील दुसरी घटना
गोकुल नगर परिसरात असलेल्या खड्यातील पाण्यात बुडून अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.याच खड्यात तीन महिन्यांपूर्वी एका चिमुकल्याचा ही बुडून मृत्यू झाला होता.
शहरातील गोकुल नगर परिसरात मोठ्या प्रमाणात मुरमाचा साठा आहे. परिसरातील नागरिक खोदकाम करून मुरूम बांधकामा साठी नेतात त्यामुळे परिसरात मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याचे खड्डे पूर्णपणे भरल्याने या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.
काही महिन्यांपूर्वी याच खड्डयात चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला होता.दि 28 ऑक्टोबर ला एक अनोळखी इसम खड्याच्या लगतच झोपलेल्या अवस्थेत परिसरातील एका महिलेला दिसला महिलेने त्या इसमाला जागे करून तिथून जाण्यास सांगितले होते.सदर अनोळखी इसम उठण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याचा तोल जाऊन तो पाणी भरून असलेल्या खोल खड्यात पडला.
महिलेने याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती दिली.घटनास्थळी पोलीस व नगर पालिकेचे अधिकारी दाखल झाले होते.मात्र रात्र झाल्याने शोध घेणे शक्य नसल्याने आज सकाळी प्रभारी आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद व त्यांच्या चमूतील राजू मूळे, किशन मुळे,गणेश मुळे,गंगाधर मुळे यांनी शोध मोहीम राबवून इसमाचा मृतदेह बाहेर काढला.पोलीस प्रशासन अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
वणी:बातमीदार