Home Breaking News विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

663

सुकनेगाव येथील घटना

रब्बी हंगामातील चना लागवडीच्या प्रयत्नात असलेल्या 25 वर्षीय तरुणाला शेतातील मोटारपंप चा करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 30 ऑक्टोबरला घडली. होतकरु तरुण शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूने सुकनेगावात शोककळा पसरली आहे.

अविनाश विलास निखाडे (25) रा.सुकनेगाव असे मृतक तरुण शेतकऱ्यांचे नाव आहे. तो सुकनेगाव येथील निवासी असून घटनेच्या दिवशी आपल्या शेतातील चना लागवडी करिता सिंचनाची तयारीत होता. शेतातील मोटार पंप सुरू करण्यासाठी तो घटनेच्या दिवशी गेला आणि दुर्दैवी घटना घडली.

अविनाशच्या वडीलाचा काही दिवसापुर्वी मृत्यू झाल्यामुळे त्यांचेवर घराची संपूर्ण जबाबदारी आली. वडिलोपार्जित शेती तो करायला लागला. खरिपातील सोयाबीन निघताच चना लागवडीसाठी तयारी करायला लागला. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला आणि मोटार पंप सुरू करीत असताना त्याला जबर झटका लागला यात त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

अविनाश च्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. होतकरू तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू मन हेलवणारा आहे. त्याचे पश्चात आई असून त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे. मात्र त्या माऊलीचा आधारच हिरावल्याने तिच्यावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
वणी: बातमीदार