●रोजगार द्या,अन्यथा आमरण उपोषण
●SDO यांना निवेदन
वेकोली नार्थ क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना येत्या १५ दिवसात रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा सर्व बेरोजगारांसह आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने उपविभागाय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
बोरगाव (अहेरी) येथील जुनाड वेकोली क्षेत्रात हिल टॉप खासगी कंपनी आली असून या कंपनीत स्थानिक रोजगारांना डावलून परप्रांतीय कामगार लावण्याची तयारी कंपनी करीत असल्याने सर्व प्रथम स्थानिकांचा या रोजगारावर अधिकार आहे. तसेच इतरही अनेक कंपन्या कार्यरत असून या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
कोरोनाच्या काळात सर्व रोजगार बंद पडले.त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. तसेच वेकोली ने शेती संपादित केल्याने शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच शेती संपादित करताना सण १९९८ मध्ये वेकोलीच्या अधिकार्यांनी स्थानिकांना रोजगारात समाविष्ट करण्याचे आश्वासन देखील दिले असून तसे लेखी पुरावे उपलब्ध आहे. ते देखील निवेदनासोबत देण्यात आले आहे.
वेकोली परिसतील संपादित क्षेत्रामधील गावांमध्ये हजारो बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. या बेरोजगारां तातडीने रोजगारात समविष्ट करून स्थानिकांना रोजगार बहाल करावा.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचितचे जेष्ठनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, रघुनाथ कारेकर,विठ्ठल विरुटकर, रवींद्र मेश्राम, उमेश गोहोकार, अक्षय लोहकरे, गीत घोष यांचे सह बोरगाव येथील असंख्य बेरोजगार युवक उपस्थित होते.
वणी:बातमीदार