● आमदार बोदकुरवार यांची मागणी
● जिल्ह्याधिकारी यांना निवेदन
वणी तालुक्यातील शिंदोला पुनवट, झरी तालुक्यातील झरी मंडळ, खडकडोह मंडळ, मारेगाव तालुक्यातील मारेगाव, वनोजादेवी व कुंभार मंडळातील शेतीचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेवुन या तिन्ही तालुक्यातील मंडळाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईत समावेश करून लाभ देण्यात यावा. अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्ह्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील कापूस, सोयाबीन, तुर हया प्रमुख पिकांची परीस्थिती ऑगस्ट महिण्यापर्यंत अत्यंत समाधानकारक होती. माहे सप्टेंबर मधील नैसर्गिक प्रकोप, अतिवृष्टी व सततचा वारा पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील कापूस पडला, बोंडे सडली, नैसर्गिक संकटाने कपासीचे झाड आहे पण फळ नाही. सोयाबीन वापले, कोंबे फुटली आणि तुर पिकांवर अतिपावसाने मररोग आला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेल पीक उध्वस्त होऊन शेतकरी हवालदिल झाले आहे. त्याना शासकिय मदतीची गरज आहे.
सप्टेंबर महिण्यात सतत पाऊस पडला होता. 20 व 21 सप्टेंबर दिवसरात्र पाऊस पडल्याने निर्गुडा, वर्धा, पैनगंगा, नदी नाले भरून पूर आला होता. त्यात नदी लगत असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त झाले. झालेल्या अतिवृष्टी पावसाची तालुका सरासरी 85 एम. एम. पावसांची नोंद झाली. उपविभागातील काही मंडळाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईत समावेश आहे.
त्याच पध्दतीने 7 मंडळाची नुकसान झालेली आहे. शासनाच्या महावेध अंतर्गत अहवाल 7 मंडळातील 0 सिमारेषे मधील एका गावातील दुसऱ्या मंडळात असलेल्या शेतात अतिवृष्टी मंडळ बदलले म्हणुन अतिवृष्टी नाही. तांत्रीक बाबीवर बोट ठेवुन या मंडळातील गावातील हजारो शेतकरी अतिवृष्टी लाभापासुन वंचित झाले आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधरात जाणार आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ पावले उचलून वणी, मारेगाव व झरी मंडळातील शेतात अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईत समवेश करून लाभ द्यावा अशी मागणी आमदार बोदकुरवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वेळी विजय पिदूरकर, दीपक मत्ते, मंगल बलकी, दिवाकर झाडे, अजय कवरासे, शंकर बांदुरकर, विजय गारघाटे, गणेश जनेकर, शालू ठाकरे, कल्पना टोंगे, ज्योती माथुलकर उपस्थित होते.
वणी: बातमीदार