Home Breaking News तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

566

एस. टी. कर्मचारी संतप्त,

पोलिसांना दिले निवेदन

विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी बेमुदत उपोषण करीत होते. त्यातच राज्य परिवहन चे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना कामावर हजर व्हावे अन्यथा सेवा समाप्तीची धमकी दिली, यामुळेच चालक चंदू किसन मडावी यांना झालेल्या मानसिक आघातानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप संतप्त कर्मचाऱ्यानी केला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा असे निवेदन ठाणेदारांना दिले आहे.

आपल्या न्याय हक्कासाठी राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले होते. वाढीव महागाई भत्त्यांना मान्यता देत कृती समितीने आंदोलन मागे घेतले. मात्र विलीनीकरणच्या मागणीवर ठाम काही कामगार संघटना 1 टक्का घरभाडे वाढ व 28 टक्के महागाई भत्ता देण्याचे राज्य शासनाच्या निर्णयाशी सहमत नव्हते.

एस टी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.संपात सहभागी असलेला चालक चंदू टेकाम याचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य करावी मृतक चालकाच्या परिवाराला वयक्तिक व शासनाकडून आर्थिक मदत व वारसांना नोकरी मिळावी या करिता पाठपुरावा करणार असून या घटनेचा अहवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना सादर करणार आहे. मृतक चालकाच्या परिवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत…संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार,वणी

वणी एसटी आगार अंतर्गत 245 चालक, वाहक कर्मचारी आहे. त्यातून तब्बल 70 कामगार 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर होते. आगाराच्या आवारात उपोषण मंडप उभारून आंदोलन सुरू केलेले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली.

घडलेल्या अनपेक्षित प्रकाराने कर्मचारी धास्तावले त्यातच प्रकृती अस्वस्थामुळे चंदू मडावी घरी गेले. त्यांना मानसिक धक्का बसला, त्यांनी कारवाई होईल या भीतीने  जेवण सोडल्याचे संतप्त कर्मचाऱ्यानी निवेदनात नमूद केले आहे. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत आगार व्यवस्थापक व अन्य अधिकारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रुग्णालयात जाऊन मृतकाच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.

वणी : बातमीदार