Home Breaking News बारच्या तिसऱ्या मजल्यावरून वेटर ची उडी

बारच्या तिसऱ्या मजल्यावरून वेटर ची उडी

1666

उपचारा दरम्यान मृत्यू 

शहरातील बियर बार मध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय इसमाने बार च्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती.  चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

बालाजी मेश्राम रा कोरपना असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो शहरातील श्याम टॉकीज परिसरात असलेल्या एका बियर बार मध्ये गेल्या 7 ते 8 वर्षा पासून काम करीत होता. काम झाल्यावर तो त्याच बियर बार मध्ये राहत होता. 5 नोव्हेंबर ला त्याने बियर बारच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती.

पहाटे तो बियर बार समोर  पडून असल्याने त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही.

वणी:बातमीदार