गाई गोधनाच्या निमित्याने तालुक्यातील पठारपूर येथे दरवर्षी होत असलेल्या डंडार नृत्यात आमदारांनी ठेका धरून नृत्य केले.
ग्रामीण भागात दंडार नृत्याला विशेष महत्व आहे. अनेक गावात दिवाळीत दंडार नृत्य करण्याची फार जुनी प्रथा आहे. तालुक्यातील पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे गाव आहे.
पठारपूर येथे गाई गोधनाच्या दिवशी रात्री दंडार नृत्य करण्याची फार जुनी परंपरा आहे. यावर्षी सुद्धा डंडार नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नृत्याला सुरवात झाली होती.
नृत्य सुरू असतांना माजी आमदार नांदेकर यांनी नृत्यावर ठेका धरून दंडार नृत्य सादर केले. शिस्तबद्ध राजकारणी असलेले नांदेकर यांनी केलेल्या नृत्यामुळे उपस्थित गावकरी अवाक झाले होते.
वणी: बातमीदार