Home Breaking News दुचाकी अपघातात WCL कर्मचारी ठार

दुचाकी अपघातात WCL कर्मचारी ठार

3135

नायगाव वळणावरील घटना

भालर येथील वेकोलीच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला घुग्गुस मार्गावरील नायगाव वळणावर अपघात झाला. या अपघातात 55 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दि. 12 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली.

रमेश यादव पाझारे (55) असे वेकोली कर्मचाऱ्यांचे नाव असून तो वणी येथील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास आहे. ते WCL च्या भालर वसाहतीत असलेल्या रुग्णालयात कार्यरत होते.

त्याची पत्नी दिवाळी निमित्याने चंद्रपूर येथे गेली होती. तिला आणण्या करिता तो आपल्या ऍक्टिवा दुचाकी क्र MH-29-BB-6160 ने चंद्रपूरला जाण्याकरिता निघाला होता. दुपारी 2 वाजताचे सुमारास घुग्गुस मार्गावर असलेल्या नायगाव वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात नेमका कसा झाला की, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
वणी: बातमीदार