Home Breaking News पैनगंगा नदीतून रेतीची अवैद्य वाहतूक करणारे ‘जेरबंद’

पैनगंगा नदीतून रेतीची अवैद्य वाहतूक करणारे ‘जेरबंद’

850

चौघे अटकेत, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त
शिरपूर पोलिसांची कारवाई

शुक्रवार दि.12 नोव्हेंबर ला दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान शिंदोला ते कैलास नगर मार्गावर अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह तिघांना ताब्यात घेत 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई शिरपूर पोलिसांनी केली.

तालुक्यात अवैद्यरित्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. निर्गुडा, विदर्भा, वर्धा व पैनगंगा नदीपात्रातील रेती साठ्यावर चोरट्यानी लक्ष केंद्रित केले आहे. बिनधास्त अवैद्य रेती तस्करी होत असताना प्रशासन मात्र गप्पगुमान आहेत.

शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कारेवाड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे शिंदोला ते कैलासनगर मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवली असता अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. याप्रसंगी ट्रॅक्टर चालकाला रेतीच्या वाहतूक परवान्यांबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.

शासनाची कोणतीही परवानगी न घेता पैनगंगा नदी पात्रातील कोलगाव घाटातून 2 ब्रास रेती व महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विठ्ठल आत्राम (40), धर्मा मोहितकर (61), अतूल बोबडे (45), भगवान चिंचोळकर (45) सर्व निवासी शिंदोला यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस उप अधीक्षक संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर काडूरे, प्रमोद जूनुनकर, सुगत दिवेकर, अनिल सुरपाम यांनी केली.
वणी: बातमीदार