Home Breaking News कत्तलीसाठी नेणारी जनावरे पोलिसांच्या ताब्यात

कत्तलीसाठी नेणारी जनावरे पोलिसांच्या ताब्यात

607
14 जनावरांसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

येथील पोलिसांना 16 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीला  खरबडा मोहल्ला  येथे अवैधरित्या कत्तली साठी गोवंश जनावराची वाहतुक होत आहे. ही गुप्त मिळालेल्या वरून सापळा रचुन धाड टाकताच बोलेरो या वाहना मधून वाहतूक होत असतांना 14 जनावरे ताब्यात घेण्यात आले आहे.

वणी परिसरातून परराज्यात मोठ्या प्रमाणात कत्तली साठी जनावरांची तस्करी होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कार्यवाह्या वरून सिद्ध होत आहे.शहरातील खरबडा परिसर याचे केंद्र स्थान बनले आहे. आता पर्यंत करण्यात आलेल्या करवाह्या मधून सर्वाधिक याच ठिकाणा वरून जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे.

वेगवेगळ्या युक्त्या करून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी केल्या जाते.मात्र पोलीस प्रशासन त्यांचा डाव हाणून पाडण्यात यशस्वी होतांना दिसत आहे.ठाणेदार श्याम सोनटक्के यांना जनावरे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यावरून मध्यरात्रीला पोलिसांनी सापळा रचला व खरबडा येथे धाड टाकली.बोलेरो वाहनात काही जनावरे निर्दयीपणे कोंबून होती तर काही जनावरे परिसरात बांधून असल्याचे निदर्शनास आल्याने 14 जनावरे ताब्यात घेऊन 4 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपींनी वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो. नि. श्याम सोनटक्के, पोउपनि शिवाजी टिपूरने,एएसआय हिरे, डी बी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, गजानन भांदकर, विजय राठोड, हरीचंद्र भरती,विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.

वणी: बातमीदार