Home वणी परिसर आदर्श सरपंच पेरे पाटील सोमवारी वणीत

आदर्श सरपंच पेरे पाटील सोमवारी वणीत

1727
Img 20240613 Wa0015
सरपंच, उपसरपंच यांना करणार मार्गदर्शन
गुरुदेव अर्बन निधी लिमिटेडचे आयोजन

आपल्या नियोजन बध्द व स्वकर्तुत्वाने पाटोदा गावाची  एक आदर्श गाव म्हणून देशात ओळख निर्माण करून देणारे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील सोमवार दि 22 नोव्हेंबर ला वणी परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करणार आहे.येथील गुरुदेव निधी अर्बन लिमिटेड च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने जनसामान्यांचे जगणे कठीण करून टाकले. विविध अफवा,ग्रामीण भागात वाढणारा कोरोना यामुळे गाव खेड्यातील नागरिक भयभीत होऊन खचलेला होता.अशा संकटाच्या काळात “गाव हेच कुटुंब” ही संकल्पना उराशी बाळगत धीर देण्याचे काम जीवाची पर्वा न करता  ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांनी केले.यात काही योध्याना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्या सर्व कोरोना योध्याचा गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आयोजन दि २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील शेतकरी मंदिर  येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला खा. बाळूभाऊ धानोरकर,जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.वजाहत मिर्झा,माजी आमदार वामनराव कासावर,वसंत जिनिंगचे अध्यक्ष देविदास काळे ,महाराष्ट्र प्रदेश इंटक चे अध्यक्ष विनोद पटोले,कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावाचे सभापती नरेंद्र ठाकरे,जि. प.सदस्य अरुणा खंडाळकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

पाटोदा गावाची ओळख आपल्या कर्तृत्वाने सुंपूर्ण राज्यांला करून देणारे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील तालुक्यातील उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्या मार्गदर्शन करणार आहे.तर कोरोना काळात गाव पातळीवर जीवाची पर्वा न करता  जनसामान्यांना संरक्षण देताना कोरोना संसर्ग झाल्याने हुतात्म्य पत्करावे लागलेल्या तालुक्यातील चिखलगाव,बोर्डा, बोरगाव,(मेंढोली)मारेगाव (कोरंबी) येथील सरपंच, उपसरपंच यांना भावपूर्ण श्रद्धांजली व कुटुंबियांचे सांत्वन मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे.

या भावस्पर्शी कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.टिकाराम कोंगरे यांनी केले आहे.

वणी : बातमीदार