Home Breaking News गुटखा वाहतूक करणारी टोळी ‘जेरबंद’

गुटखा वाहतूक करणारी टोळी ‘जेरबंद’

646

22 लाखाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा परराज्यातून वाहतूक करून आणणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने कारवाही करून जेरबंद केले आहे. त्यांचे जवळून 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू व गुटखा यावर पुर्णतः बंदी केली आहे. तरी देखील शौकिनांची तलब भागविण्यासाठी लगतच असलेल्या तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून सुगंधित तंबाखू व गुटखाची तस्करी केल्या जात आहे.

अदिलाबाद येथुन अवैधरित्या पानमसाला व सुगंधीत तंबाकु विक्री करीता यवतमाळ जिल्ह्यात येत असल्याची गोपनिय माहीती पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना मिळाली होती. त्यावरून सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेला कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते.

सपोनि अमोल पुरी सायबर सेल यवतमाळ व सपोनि विनोद चव्हान ठाणेदार पारवा यांचे पथकाने प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारे अन्न व औषध विभागाचे गोपाल माहोरे-अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह पाटणबोरी ते सदोबा सावळी या मार्गावर सापळा रचला व पायलटींग करणारे वाहन MH-03 -Z – 2916 टाटा सुमो व माल वाहतुक करणारे  वाहन MH-37-J-951महिद्रा पिकप हे दोन वाहन ताब्यात घेतले.

वाहन महिद्रा पिकप मधुन गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाकु असा एकूण 10 लाख 88 हजार 400 रुपयांचा गुटखा, दोन वाहन किंमत अंदाजे 12 ललाख,  गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाकु लपविण्या करीता खाली कॅरेट 40 नग व नगदी 9 हजार रुपये असा एकूण 22 लाख 16 हजार 400 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेख अनार शेख गफार (47), भिमराव मधुकर उईके (38), मो. अफताब मो. आयुब (39), अल्ताफ अफसर शेख (20) वर्षे सर्व रा आर्णी यांना ताब्यात घेण्यात आले तर आरोपी नामे सलिम शेख गफुर (41) व शेख मेहबुब शेख सादीक दोन्ही रा. शास्त्री नगर आर्णी हे घटनास्थळा वरुन फरार झाले आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे यांच्या आदेशाने LCB पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पुरी, सपोनि विनोद चव्हान, पोउपनि योगेश रंधे, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, अजय निंबोळकर, पंकज गिरी, रोशनि जोगळेकर व प्रगती कांबळे व चालक प्रविन कुचे सर्व सायबर सेल यवतमाळ यांनी पार पाडली.

वणी : बातमीदार