● एकमेकांना बदडले, प्रकरण पोलिसात
● तिढा आर्थिक व्यवहाराचा
शहरात “रंग-दार” जोडी चांगलीच प्रख्यात होती. त्यांना “रंगा- बिल्ला” या टोपण नावाने सुद्धा ओळखल्या जात होते. एकेकाळचे जिवलग मित्र कालांतराने कट्टर वैरी झाल्याचे शनिवारी घडलेल्या घटनेने उजागर झाले आहे.
“रंग-दार” जोडीनेच खऱ्या अर्थाने रेती तस्करीची शहरात मुहूर्तमेढ रोवली. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ” black diamond” सिटीत रेती तस्करीत लिप्त या जोडीचे कारनामे चांगलेच गाजले. रेती चोरीच्या माध्यमातून अफाट धनसंपत्तीचा संचय करण्यात आला.
जमलेल्या धनसंपदेतून शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठा भूखंड याच “रंग-दार” जोडीतील एकाने विकत घेतला. दुसऱ्याने त्या भूखंडाची मोजणी करताना तिसऱ्याचे हित साधण्याचा प्रयत्न केला आणि ‘ठिणगी’ पडली.
भूखंडाच्या मोजणी वरून वाद झाल्याने जिवलग मैत्री सम्पूष्टात आली. शब्दाची लाखोंळी वाहत एकमेकांना चांगलेच बदडले. प्रकरण पोलिसात पोहचले, पोलिसांनी सामंजस्याने दोघांनाही समजावले आणि अदखलपात्र गुन्हा परस्परविरोधी दाखल करण्यात आला.
शहरातील “रंग-दार” जोडीत आर्थिक कारणावरून फूट पडल्याचे दिसत असले तरी एकेकाळचे जिवलग मित्र आता कट्टर वैरी झालेत. “जर, जोरू आणि जमीन” या तीनपैकी एक बाब पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढायला लावतात हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
वणी: बातमीदार