Home वणी परिसर पेट्रोल पंपा समोर वाहनांच्या रांगाच रांगा

पेट्रोल पंपा समोर वाहनांच्या रांगाच रांगा

1092

अपघाताची शक्यता

वाहतूक पोलिसांनी केली कारवाही 

वरोरा मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप समोर डिझेल भरण्यासाठी सकाळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागतात त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याने आज वाहतूक विभागाने या वाहनांवर कारवाही केली आहे.

शहरात जड वाहनांना बंदी केली आहे{ देखील पेट्रोल भरण्यासाठी जड वाहने शहरात येत असतात. सकाळी वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसल्याचे पाहून ट्रक चालक बिनधास्त पणे वाहन शहरात आणतात.

वणी परिसरात असलेल्या कोळसा खाणी मुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्तावर धावत आहे.त्यामुळे अनेक अपघात देखील कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनाने झाले आहे.वरोरा मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपा वर डिझेल भरण्यासाठी सकाळी रस्त्याच्या दुतर्फा ट्रकच्या रांगा लागतात त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. याची दखल वाहतूक निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी घेऊन दि 22 नोव्हेंबर ला सकाळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या 13 ट्रक वर कारवाही करून 4 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वणी : बातमीदार