Home राजकीय पणन प्रतिनीधीसाठी पक्षश्रेष्ठी पेचात…!

पणन प्रतिनीधीसाठी पक्षश्रेष्ठी पेचात…!

483

इच्छुकांनी उघडली स्वाक्षरी मोहीम

पुन्हा संचालकाची सभा होण्याची चीन्हे

वसंत जिनींग अँड प्रेसीग फॅक्टरीकडून पणन महासंघावर पाठवावयाच्या प्रतिनीधीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या कोर्टान पाठविण्यात आला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी तो अजूनपर्यंत टोलवता आला नाही. रिंगणातील दोन्ही उमेदवार सारख्याच तोडीचे असल्याने पक्षश्रेष्ठी समोरही पेच निर्माण झाला आहे.

पणन महासंघाच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार म्हणून येथिल वसंत जिनींग फॅक्टरीच्या संचालक मंडळातून एक प्रतिनीधी पाठवायचा आहे. त्यासाठी संचालक मंडळाची सभा घेण्यात आली. मात्र सभेमध्ये ऍड देविदास काळे व प्रमोद वासेकर ही दोन नावे आल्याने व दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने, नाव निश्चितीचा चेंडू पक्षश्रेष्ठीच्या कोर्टात ढकलण्यात आला होता.

मात्र आठवडा होऊन सुद्धा पक्षश्रेष्ठींनीही यावर निर्णय न दिल्याने अजूनही संभ्रमावस्या कायम आहे. म्हणून आता दोघेही स्वतःच आपला जोर लावून आपली वर्णी लाऊन घेण्याच्या तयारीला लागले आहे. जर यासाठी पुन्हा संचालक मंडळाची सभा घ्यावी लागली तर आपल्या बाजुने अधिक संचालक असावेत यासाठी दोघेही आताच समर्थन देणाऱ्या संचालकांच्या स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू केली  आहे.

संचालकांच्या या मनधरणी मुळे  संचालकांनाही भाव आले आहेत. पक्षश्रेष्ठी वर  निर्णय सोपविला नंतर आता पुन्हा संचालकांचे बहुमत तपासण्याची गरज काय ? असा प्रश्न काही संचालक विचारीत आहे. हा तिढा कधी सुटणार कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

खरेदी-विक्री संघाचाही तिढा कायम

खरेदी-विक्री संघातून पाठवायच्या प्रतिनिधींचाही निर्णय सभेमध्ये झाला नाही.त्यामुळे आता त्यांचा तिढा आमदार बोदकुरवार यांच्या दारात गेला आहे. आमदारांचा निर्णय अंतिम असल्याचे संचालक मंडळाने कबूल केले आहे.

वणी : बातमीदार