● पक्षश्रेष्ठींचा कौल वासेकरांकडे
● शनिवारी घडली घडामोड
येथिल वसंत जीनींग फॅक्टरीतून पणन महासंघावर पाठवावयाच्या प्रतिनीधी साठी चांगलीच रस्सीखेच सुरू होती. दोन संचालकां मध्ये एकमत होतं नसल्याने निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठीच्या कोर्टात गेला होता. अखेर एक आठवड्यानंतर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेऊन प्रमोद वासेकर यांच्या बाजूने कौल दिला आहे.
येथील वसंत जिनिंग फक्टरीत 16 संचालक आहे. प्रतिनिधी पाठविण्यासाठी पणन महासंघाने पत्र पाठविले आहे. प्रतिनिधीची निवड करण्याकरिता संचालक मंडळाची सभा घेण्यात आली होती. मात्र वसंत जिनिंग फक्टरी चे अध्यक्ष ऍड देविदास काळे व संचालक प्रमोद वासेकर हे दोन नावे पुढे आल्याने सभे मध्ये एकमत होऊ शकले नव्हते त्यामुळे निर्णयाचा चेंडू ‘पक्षश्रेष्ठी’ माजी आमदार वामनराव कासावार यांच्या कोर्टात टोलवण्यात आला होता.
पक्षश्रेष्ठींनी आठवडा लोटूनही निर्णय न घेतल्याने दोन्ही इच्छुकांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी संचालकांची मनधरणी सुरू केली होती. अखेर शनिवार दि 27 नोव्हेंबर माजी आमदार वामराव कासावार यांच्या निवासस्थानी ऍड देविदास काळे व प्रमोद वासेकर या दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि पणन साठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद वासेकर यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी कौल दिला.
आता वसंत जीनींगच्या सभेत वासेकरांच्या नावाचा ठराव मंजूर करून पणन महासंघाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता प्रतिनीधी, निवडीच्या चर्चेला पूर्णविराम मीळाला आहे, प्रमोद वासेकर यांचे सर्वत्र अभीनंदन होत आहे.
खरेदी-विक्रीतून ऍड एकरेंची वर्णी
खरेदी-विक्री संघातून पणन महासंघावर प्रतिनिधी पाठवण्यासाठी झालेल्या सभेत एकमत न झाल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे वर निर्णय सोडला होतो. आमदार बोदकुरवार यांनी ऍड विनायक एकरे यांच्या नावाला पसंती दिल्याने खरेदी-विक्री तुन ऍड एकरे यांची वर्णी लागली आहे.
वणी : बातमीदार