Home Breaking News एस. टी. महामंडळात निलंबनाचे ‘सत्र’

एस. टी. महामंडळात निलंबनाचे ‘सत्र’

585

आजपर्यंत 22 निलंबित तर 7 बडतर्फ

शासनाने एस टी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. दिलेल्या दिवशी कामावर रुजू न झाल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने वणी आगारातील 12 कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी तर 10 कर्मचाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. तसेच मंगळवारी 7 कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला जवळ जवळ एक महिना पूर्ण होत आहे. एस टी च्या संपामुळे मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

दि 30 नोव्हेंबर ला वणी आगारातून यवतमाळ करिता दोन बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अंकुश पाते व अंकुश आत्राम हे दोन कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यांनी सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात यवतमाळ करिता बस रवाना केली. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा बाजी करीत या कर्मचाऱ्यांचा निषेध केला.

शासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी 12 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. दि. 29 नोव्हेंबर ला पुन्हा 10 कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश पारित करण्यात आले तर 7 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
वणी: बातमीदार