Home वणी परिसर बेपत्ता बालक चंद्रपुरातील सीसीटीव्हीत “कैद”

बेपत्ता बालक चंद्रपुरातील सीसीटीव्हीत “कैद”

1442

7 दिवसांपूर्वी घरातून निघून गेला
अद्याप त्याचा शोध लागला नाही

शहरातील एक विद्यालयात दहावीत शिकणारा 16 वर्षीय विद्यार्थी रागाच्याभरात घरातून निघून गेला. 7 दिवस लोटले तरी त्याचा ठावठिकाणा लागला नाही. पोलीस तसेच पारिवारिक मंडळी कसून त्याचा शोध घेत आहे. तो काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातील सीसीटीव्हीत “कैद” झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अद्याप त्याचा शोध लागला नाही.

कृष्णा प्रवीण काकडे (16) असे बेपत्ता झालेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे. तो पळसोनी येथील रहिवासी असून शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये इय्यता 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे.

मंगळवार दि. 23 नोव्हेंबर ला तो सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. घरून निघतांना त्याने पैसे व काही कपडे सोबत घेतले होते. गावावरून वणीत आल्यानंतर तो साई मंदिर चौकात ऑटो मधून उतरला. शाळेतील मित्राचे पुस्तक परत केले आणि नादारद झाला.

कृष्णा, सायंकाळ पर्यंत घरी परतला नसल्याने पालकांनी शाळेत विचारणा केली. तो शाळेत आलाच नसल्याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

कृष्णा, कोणालाच काहीही न सांगता निघून गेल्याने घरची मंडळी त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली आहेत. त्याचे जवळ मोबाईल नसल्याने तांत्रिक बाबींवरून तपास करणे अवघड झाले आहेत. मित्रमंडळी व नातेवाईकांना विचारणा सुरू आहे. चंद्रपुरातील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो दिसला मात्र त्यानंतर तो कुठे गेला याचा शोध पोलीस घेत आहे.
वणी: बातमीदार