Home Breaking News ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार

ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार

3863

गुंजच्या मारोती जवळ अपघात

वरोरा मार्गावर असलेल्या टी पॉईंट वर ट्रक ने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली. मृत्यूकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

वरोरा मार्गावर गुंज मारोती जवळ टी पॉईंट आहे.हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.वरोऱ्या वरून mh 34 bm 6011 या क्रमांकाच्या दुचाकीला mh 34 dg 1525 क्रमांकाच्या ट्रक ने मागून जोरदार धडक दिली.

धडकेने दोन्ही दुचाकीस्वार खाली पडले व मागवून येणाऱ्या ट्रक ने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडतात ट्रक चालक फरार झाला असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.अपघातात ठार झाले युवक नेमके कोण व कुठले आहे याची माहिती पोलीस प्रशासन घेत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleझाडाला गळफास लावून आत्महत्या
Next articleशेतातील बंड्यातून 20 क्विंटल कापसाची चोरी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.