Home Breaking News त्या …बेपत्ता बालकाचा तातडीने शोध घ्या

त्या …बेपत्ता बालकाचा तातडीने शोध घ्या

837
Img 20240930 Wa0028

ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

तालुक्यातील पळसोनी या गावात वास्तव्यास असलेला 16 वर्षीय मुलगा पंधरा दिवसापासून बेपत्ता आहे. तो कुठे गेला या बाबत अद्याप ठावठिकाणा लागला नाही. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून तातडीने तपास करावा असे साकडे ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांना घातले आहे.

कृष्णा प्रवीण काकडे (16) असे बेपत्ता झालेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे. तो पळसोनी येथील रहिवासी असून शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये इय्यता 10 व्या वर्गात शिक्षण घेत होता.

मंगळवार दि. 23 नोव्हेंबर ला तो सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. घरून निघतांना त्याने पैसे व काही कपडे सोबत घेतले होते. गावावरून वणीत आल्यानंतर तो साई मंदिर चौकात ऑटो मधून उतरला. शाळेतील मित्राचे पुस्तक परत केले आणि तेव्हा पासूनच तो घरी परतला नाही.

कृष्णा, घरी परतला नसल्याने पालकांनी शाळेत विचारणा केली. तो शाळेत आलाच नसल्याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

पंधरा दिवस लोटले तरी त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पालक व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत प्रकरणाचे गांभीर्य बघता आपले स्तरावर तातडीने तपास करण्यात यावा, असे साकडे घातले आहे.

या प्रसंगी प्रवीण काकडे (वडील), रेखा काकडे (आई), मधुकर काकडे (आजोबा), प्रवीण खानझोडे, सरपंच बंडू खंडाळकर, उपसरपंच जयमाला टेकाम, रंजना ठमके, पुखराज खैरे, पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे, सुरज चौधरी यांचेसह ग्रामस्थांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
वणी: बातमीदार