● प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न
विदर्भ राज्य हे केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे वक्तव्य चार दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले. या वक्तव्याचा निषेध नोंदविण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न 7 डिसेंबर ला दुपारी करण्यात आला.
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी 1905 पासूनची आहे. शासनाने नेमलेल्या दार आयोग, जे.व्ही.पी.कमिटी, राज्य पुनर्रचना आयोग, संग्राम समिती व इतर समित्यांनी सुध्दा विदर्भ राज्य सक्षम राहणार असल्याचे अहवालही दिले आहेत.
भाजप ने तर 1997 सालीचा भुवनेश्वर येथील अधिववेशनात ठराव पारित करून विदर्भाची मागणी केंद्राला केली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी 2014 साली दिल्लीत जर भाजप चे सरकार आले तर तात्कालीन भाजप चे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी वेगळे विदर्भ राज्य देण्याचे लेखी आश्वासनही दिले होते.
विदर्भ आंदोलन समितीच्या वतीन स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी प्रखर आंदोलन सुरूच आहे. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी तर कोणतीही माहिती न घेता असा प्रस्तावच नव्हता असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन म्हणून निषेध करीत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुतळा ताब्यात घेतला.
याप्रसंगी यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रा. पुरुषोत्तम पाटील, कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज, युवक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा संघटक राजू पिंपळकर, वणी शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर, मारेगांव तालुका अध्यक्ष राहुल झट्टे, सिद्धार्थ टाकसंडे, पुंडलिक पथाडे, शालिनी रासेकर, अलका मोवाडे, कलावती क्षीरसागर यासह विदर्भवादी उपस्थित होते.
वणी: बातमीदार