Home वणी परिसर संसदेत खासदार धानोरकरांचा मराठी बाणा

संसदेत खासदार धानोरकरांचा मराठी बाणा

580

केंद्रीय विद्यालयाला स्वतंत्र इमारत द्या

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात एकमेव असलेले खासदार बाळू धानोरकर हे  महाराष्ट्रा बरोबरच लोकसभा क्षेत्राचे प्रश्न सातत्याने संसदेत उचलून धरतात जिल्ह्यातील आर्णी क्षेत्रात असलेल्या केंद्रीय विद्यालया ला स्वतंत्र इमारत देण्याची मागणी संसदेत लावून धरली असून संपूर्ण भाषण त्यांनी मराठीतून करून आपला मराठी बाणा दाखविला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जनगणना सन २०११ नुसार २७ लाख ७२ हजार असून त्यापैकी ५ लाख १५ हजार लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांच्या ओढा सीबीएसई अभ्यासक्रमात वाढत आहे. विशेष करून केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेण्याकडे कल जास्त असतो. परंतु तब्बल १४ वर्ष लोटून देखील हे केंद्रीय विद्यालय यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाच्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहात सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयात वर्ग पहिली ते बारावी पर्यंत एकून ५६० विद्यार्थी शिक्षण घेत असून ३६ मंजूर पदापैकी केवळ १८ पदे भरलेली आहे. शिक्षक अत्यल्प असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देणे कठीण होत आहे. त्यामुळे येथील सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांवर मागील १४ वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यामुळे त्वरित यवतमाळ जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय करिता स्वतंत्र इमारत द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

वणी : बातमीदार