Home Breaking News दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

3915

भालर मार्गावरील घटना

भालर मार्गावर भरधाव दुचाकीच्या समोर डुक्कर आल्याने भीषण अपघात झाला. यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून ही घटना सोमवार दि. 13 डिसेंबर ला 10 वाजताच्या दरम्यान घडली.

प्रबोध रणजित चांदेकर (22) रा छोरीया लेआऊट हा तरुण वणीकडे जात असताना भालर येथे अभिनव कांबळे (23) रा. नागपूर या युवकाने लिफ्ट मागितली. दुचाकीवरून दोघे मार्गक्रमण करत होते आणि अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला.

तालुक्यातील भालर मार्गावर डम्पिंग ग्राउंड जवळ अनेकदा अपघात होतो. येथे रानटी व गावठी डुक्करांचा चांगलाच राबता आहे. अनेकांना या मार्गावर आपला जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी सकाळी दुचाकी क्रमांक MH-29-BT- 3216 वरून दोन तरुण रेसर दुचाकीने भरधाव जात असताना अचानक डुक्कर समोर आला. यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झालेत.

अपघातात जखमी तरुणांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी: बातमीदार