Home वणी परिसर संस्कारचे खेळाडू विभागीय व्हॉलीबॉल संघात

संस्कारचे खेळाडू विभागीय व्हॉलीबॉल संघात

471

सहा मुलींची निवड

स्थानिक संस्कार क्रीडा मंडळा च्या सहा खेळाडूंची अठरा वर्षाआतील मुलींच्या अमरावती विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली आहे.

येथील संस्कार क्रीडा मंडळाच्या वतीने शासकीय मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून खेळाडूंना व्हॉलीबॉल चे प्रशिक्षण दिल्या जात आहे.या मंडळातील खेळाडूंनी विद्यापीठ, राष्ट्रीय व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.

वरोरा येथे महाराष्ट्र राज्य सब – ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्ये दिव्या बोबडे , विधी डुकरे , निशा डवरे, पूर्वा हरदिया, हर्षाली नागतुरे, प्रगती मेश्राम या सहा मुलींची अमरावती विभागीय संघात निवड करण्यात आली आहे.

वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे , एलेव्हन स्टार क्रीकेट मंडळाचे नदिम शेख, शैलेश ढोके, संजय निमकर, संतोष चिल्कावार मंगेश करंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमागे प्रशिक्षक रुपेश पिंपळकर वरिष्ठ खेळाडू संतोष बेलेकर गणेश पिदुरकर प्रदिप कवराशे यांच्या मार्गदर्शनात अथक परिश्रम घेत आहे.

वणी : बातमीदार