Home Breaking News आज…शहरातील बिअर-बारची झाडाझडती..!

आज…शहरातील बिअर-बारची झाडाझडती..!

841
Img 20240930 Wa0028

अबकारी विभागाला आत्ताच आठवले नियम..!

चक्क 90 टक्के बार बंद होणार

वणी शहरातील बिअर-बार वर उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक कारवाई करताहेत. हाच विभाग कोरोना कालखंडात नेमका कुठे होता अशी चर्चा रंगायला लागली आहे. नियमबाह्य कृती करणाऱ्यांना अभय देणाऱ्या विभागाला आत्ताच नियम आठवल्याने संभ्रम निर्माण होत आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिनस्त दारू दुकाने चालतात. येनकेन प्रकारे महसूल मिळावा यासाठी सदोदित प्रयत्नरत असलेला विभागच शहरातील बिअर-बारची झाडाझडती करून कारवाईचे अस्त्र उगारत आहे.

उत्पादन विभागाची कार्यपद्धती नेमकी काय हा संशोधनाचा विषय आहे. कोरोना कालखंडात दारू विक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकावर जिल्हाधिकारी यांनी वेळेचे बंधन लादले होते. त्यावेळी संबंधित विभागाने महसूल वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले.

संबंधित विभाग सातत्याने लिपापोती करताना दिसतो. बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात त्यावेळी 400 पेट्या दारूची विक्री होत होती. याचा लेखाजोखा दररोज उत्पादन शुल्क विभागामार्फत सादर होत होता. तेव्हा नियमांचे पालन का केले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील तसेच तालुक्यातील अनेक ढाब्यावर सदोदित खुलेआम दारू विक्री होत आहे. स्थानिक उत्पादन शुल्क विभाग नेमके करतात काय असा प्रश्न उपस्थित होत असून परवाना धारकांनाच ‘टार्गेट’ का करण्यात येते या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे.

नियमांचे पालन अनुज्ञप्ती धारक करत नसेल तर कारवाई गरजेचीच आहे. भल्या पहाटे सकाळीच आपली दुकाने उघडणारे व रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्यावर कारवाई कोण करणार हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
वणी: बातमीदार