● शिरपूर पोलिसांची कारवाई
शिरपूर पोलिसांनी मंगळवार दि. 14 डिसेंबर ला रात्री उशिरा अवैद्य रेती वाहतूक विरोधात धाडसत्र अवलंबले. यावेळी दोघांना जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता चक्क 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने रेती चोरट्याचे धाबे दणाणले आहे.
गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर आळा घालण्यासाठी शिरपूर पोलीस सरसावले आहेत. ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकांनी अवैद्य रेती वाहतूक विरोधात मोहीम राबवली असता ट्रॅक्टरसह रेती चोरटे गळाला लागले.
ट्रॅक्टर चालक गोमाजी श्रीराम तावडे रा.वारगाव व ट्रॅक्टर मालक धनराज साळवे रा. चारगाव हे विनापरवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आले. त्यांना रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता तो त्यांच्याजवळ नव्हता. पोलिसांनी गुन्हा नोंद करून 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत लपूनछपून रेतीचे अवैद्य उत्खनन व वाहतूकीने डोकेवर काढले आहे. विदर्भा, निर्गुडा, वर्धा व पैनगंगा नदीतील रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रेती चोरट्यावर कारवाईचा बडगा महसूल प्रशासनाने उगाराने गरजेचे असताना पोलिसांनाच पाळत ठेऊन कारवाई करावी लागत आहे.
दोन्ही रेती चोरट्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई ठाणेदार गजानन करेवाड, पीएसआय रामेश्वर कांडूरे, पोहेका टेकाम, नापोका सुगत दिवेकर, प्रमोद जूनुनकर, अभिजीत कोशटवार यांनी केली.
वणी: बातमीदार