Home Breaking News आणि…अनियंत्रित वाहन पुलावरून खाली कोसळले

आणि…अनियंत्रित वाहन पुलावरून खाली कोसळले

1114

एका युवकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

चंद्रपूर : बाबुपेठ-बल्हारपूर रेल्वे पुलावरून मार्गक्रमण करणारे भरधाव चारचाकी वाहन अनियंत्रित झाले आणि चक्क पुलावरून खाली कोसळले. थरकाप उडवणाऱ्या या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि. 19 डिसेंबरला दुपारी 4 वाजता घडली.

अभिषेक गुप्ता असे मृतकाचे नाव असून मोहन रेड्डी, रोहित नागलवार, चिंटू तोगरवार हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूर येथून बल्हारपूरकडे निघालेले MH- 34-BR- 0141 हे चारचाकी वाहन भरधाव वेगाने बाबुपेठ-बल्हारपूर रेल्वे उड्डाणपुलावरून जात असताना अपघात झाला. हे सर्व युवक बल्लारपूर येथील निवासी असल्याचे कळते.

उड्डाणपुलावरून अचानक वाहन खाली कोसळताच प्रत्यक्षदर्शींच्या मनाचा थरकाप उडाला. अतिशय भीषण अपघातात वाहनाचा चुराडा झाला असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना तातडीने पुढील उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहेत.
चंद्रपूर: बातमीदार